नमस्कार मित्रांनो,
आज आपण श्री गणेश आरती मराठी मध्ये लिरिक्स सोबत बघणार आहोत, श्री गणेशाच्या बऱ्याच आरत्या खूप प्रसिद्ध आहेत त्यापैकी काही आरती आम्ही आपल्याकरिता घेऊन आलो आहोत.
ganesh aarti in marathi lyrics | श्री गणेशाची आरती लिरिक्स सोबत
चला तर मग आपण पहिली आरती बघू :-
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
आरती क्रमांक दोन
जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ ध्रु० ॥
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरको ॥
हाथ लिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हूँ पदको ॥१॥
अष्टी सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगलमूरत अधिकाई ॥
कोटीसुरजप्रकाश ऐसी छबि तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झुले शशिबहारी ॥जय० ॥२॥
भावभगतिसे कोई शारणागत आवे ।
संतति संपति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भवे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय० ॥३॥
आरती क्रमांक तीन
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
तुझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ॥ ध्रु० ॥
नानापरिमळ दूर्वा शमिपत्रें ।
लाडू मोदक अन्नें परिपूरित पातें ।
ऐसें पूजन केल्या बीजाक्षरमंत्रें ।
अष्टहि सिद्धी नवनिधि देसी क्षणमात्रें ॥१॥
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती ।
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरती ॥
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती ॥ जय देव० ॥ २ ॥
शरणागत सर्वस्वे भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवर शाशितरणी ॥
त्रैयोक्यों ते विजयी अद्भुत हे करणी ।
गोसावीनंदन रत नामस्मरणीम ॥ जय देव जय देव० ॥३॥
आरती क्रमांक चार
तूं सुखकर्ता तूं दुःखकर्ता विघ्नविनाशक मोरया ।
सिंदुरमंडित विशाल सरळ भुजदंडा ॥ ध्रु० ॥
प्रसन्नभाळा विमला करिं घेउनि कमळा ।
उंदिरवाहन दोंदिल नाचसि बहुलीळा ॥
रुणझुण रुणझुण करिती घागरिया घोळा ।
सताल सुस्वर गायन शोभित अवलीळा ॥ जय देव० ॥ १ ॥
सारीगमपधनी सप्तस्वरभेदा ।
धिमिकिट धिमिकिट मृदंग वाजति गतिछंदा ॥
तातक तातक थैय्या करिसी आनंदा ।
ब्रह्मादिक अवलोकिती तव पदारविंदा ॥ जय देव० ॥ २ ॥
अभयवरदा सुखदा राजिवदलनयना ।
परशांकुशलड्डूधर शोभितशुभरदना ॥
ऊर्ध्वदोंदिल उंदिर कार्तिकेश्वर रचना ।
मुक्तेश्वर चरणांबुजिं अलिपरि करिं भ्रमणा ॥ ३ ॥
ganesh aarti in marathi lyrics मध्ये आपल्याला मिळाली असेल तरी आपण वरील आरत्यांचे प्रिंट आउट काढून गणेशाचे वंदन करू शकता धन्यवाद.

.jpg)
.jpg)
.jpg)