शेयर मार्केट म्हणजे काय ? सोपी व्याख्या -
शेअर बाजार म्हणजे असा बाजार जिथे कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री केली जाते.
हे शेअर्स कंपनीच्या मालकीचा एक भाग दर्शवतात. शेअरच्या किमतीत वाढ झाल्यास तुमचा नफा होतो, आणि घटल्यास तोटा होतो. गुंतवणूक करण्यापूर्वी बाजार समजून घेणे आणि सल्लामशर्त घेणे फार महत्त्वाचे आहे.
शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात पण कुठून सुरुवात करावी हे माहित नाही? ही ब्लॉग पोस्ट तुमच्यासाठीच आहे!
शेयर म्हणजे काय?
शेयर बाजार म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी प्रथम आपण जाणून घेऊ की शेअर म्हणजे काय?
साधारणतः बोलतांना आपण शेअरविषयी बोलत असतो तेव्हा आपला हेतू एखाद्या कंपनीद्वारे आपल्या मूळ धनाला एक निश्चित प्रमाणात वाटप केलेल्या भागाशी असतो. म्हणजेच दुसऱ्या शब्दात शेअरचा मूळ अर्थ कार्यभारात भागीदारी आहे.
‘याचा सरळ सरळ उघड अर्थ आहे’ की जेव्हा आपण एखाद्या शेयर मध्ये गुंतवणूक करू पाहत आहात तेव्हा आपण आपला पैसा बाजारातील एखाद्या सौद्याला खरेदी करण्यासाठी खर्च करीत नसता तर एक संपूर्ण व्यवहारात भागीदारी मिळवीत असता. या तऱ्हेने आपण अंशतः त्या कंपनीचे मालक बनता.
जेव्हा आपण एखाद्या कंपनी वा व्यवहाराचे संचालन करतो तेव्हा आपल्याजवळ फायदा आणि नुकसान दोन्हीची सामान शक्यता गृहीत असते.
शेयर कसे प्रचलित होतात?
सर्व कंपन्या ज्या शेयर प्रचारात आणतात, तेव्हा त्यांची किंमत ठरलेली असते जिला बाजाराच्या भाषेत ‘निश्चित मूल्य’ अथवा ‘फेस व्हॅल्यू’ असे म्हणतात. हे मूल्य शेअर सर्टिफिकेटवर स्पष्टपणे दर्शविलेले असते. भारतात हे निश्चित मूल्य १० रुपये असते. कंपन्यांनी आता हे मूल्य ५ रुपये, २ रुपये व १ रुपयांपर्यंतच्या शेअरमध्ये विभागणे सुरु केले आहे. दर्शनी मूल्य कंपनीच्या खात्यात शेयर संकेतक मूल्य असते. नंतर बाजारात हा कोणत्याही मूल्यावर खरेदी-विक्री केला जाऊ शकतो.
येथे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे की बाजारात शेयर मूल्य निरंतर वाढत वा घाटत असते आणि त्याचा दर्शनी मूल्याशी काहीही संबंध नसतो; परंतु शेयर लाभांश शेअरच्या ‘परताव्हॅल्यू’ च्या आधारावरच निश्चित केला जातो.
जेव्हा की चलनवाढीमुळे रुपयाचे अवमूल्यन १५ टक्के झाले आहे. त्याचाच अर्थ आपण गुंतविलेल्या पैशांचे सध्याचे मूल्य ११५० रुपये झाले आहे. आपण पाहता की , प्रत्यक्षात आपण गुंतविलेल्या पैशात जरी १०० रुपये वाढ झाली; पण चालू चलनाच्या हिशोबात आपले पन्नास रुपयांनी नुकसान झालेले आहे.
जर या घटनेला अर्थशास्त्रीय व्याख्येत सांगायचे असले तर असे म्हणता येईल की चलनाचे मौलिक मापदंड मूलतः त्याआधारे खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवा यावरून पारखता येते.
स्पष्ट शब्दांत आपण आपल्या जमा संपत्तीचा उपयोग ती जमा स्थिर अथवा तिला वाढविण्यासाठी करतो त्याला गुंतवणूक म्हणतात, वाटले तर आपण त्याचा उपयोग सोने, चांदी अशा वस्तू खरेदीसाठी केला असेल वा जमीन, घर इत्यादी सारखी एखादी अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी.
खरे तर आपण भांडवलदार आहात म्हणून आपले भांडवल स्थिर ठेवणे किंवा ते वाढविणे याकरिता आपण त्याचा उपयोग करीत आहात.
येथे हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे की बाजारात शेयर मूल्य निरंतर वाढत वा घाटत असते आणि त्याचा दर्शनी मूल्याशी काहीही संबंध नसतो; परंतु शेयर लाभांश शेअरच्या ‘परताव्हॅल्यू’ च्या आधारावरच निश्चित केला जातो.
गुंतवणूक कशाला म्हणतात?
माना की आपण आपल्या पैशांनी एखादा जमिनीचा तुकडा खरेदी केला आहे ज्याची किंमत त्या वेळी १००० रुपये आहे. रस्ते विकास किंवा आसपासची जबाबदारी लक्षात घेता वरील जमिनीच्या किमतीत पाच वर्षांत फक्त दहा टक्के वाढ झाली आहे. म्हणजे ज्या जमिनीची आजची किंमत ११०० रुपये झाली आहे.जेव्हा की चलनवाढीमुळे रुपयाचे अवमूल्यन १५ टक्के झाले आहे. त्याचाच अर्थ आपण गुंतविलेल्या पैशांचे सध्याचे मूल्य ११५० रुपये झाले आहे. आपण पाहता की , प्रत्यक्षात आपण गुंतविलेल्या पैशात जरी १०० रुपये वाढ झाली; पण चालू चलनाच्या हिशोबात आपले पन्नास रुपयांनी नुकसान झालेले आहे.
जर या घटनेला अर्थशास्त्रीय व्याख्येत सांगायचे असले तर असे म्हणता येईल की चलनाचे मौलिक मापदंड मूलतः त्याआधारे खरेदी केलेल्या वस्तू किंवा सेवा यावरून पारखता येते.
स्पष्ट शब्दांत आपण आपल्या जमा संपत्तीचा उपयोग ती जमा स्थिर अथवा तिला वाढविण्यासाठी करतो त्याला गुंतवणूक म्हणतात, वाटले तर आपण त्याचा उपयोग सोने, चांदी अशा वस्तू खरेदीसाठी केला असेल वा जमीन, घर इत्यादी सारखी एखादी अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी.
खरे तर आपण भांडवलदार आहात म्हणून आपले भांडवल स्थिर ठेवणे किंवा ते वाढविणे याकरिता आपण त्याचा उपयोग करीत आहात.
त्याबरोबर आपल्या अपेक्षा काय आहेत?
गुंतवणूक करून आपण आपले भांडवल वाढवत आहात का?
नियमित उत्पन्न किंवा दोन्ही; पण आपल्या अपेक्षांसोबतच आपल्याकरिता हे ओळखणे आवश्यक आहे की भविष्यात आपल्या अपेक्षा काय आहेत, आवश्यकता काय आहेत हे तपासून पाहिल्यामुळे आपण आपल्या प्राथमिकता सहजपणे निश्चित करू शकाल आणि आपल्या समोर हे स्पष्ट होईल की आपण आपल्या गुंतवणुकीवर किती वाढ आणि किती उत्पन्न इच्छिता.
तेव्हा आपल्याला हा निर्णय घेणे सोपे होईल, की कोणती गुंतवणूक आपल्यासाठी उपयुक्त आहे. आपल्या प्राथमिकता निश्चित करणे एक चांगल्या गुंतवणूदारासाठी अति आवश्यक आहे आणि हीच भांडवल गुंतवणुकीची कला आहे.
जागतिकीकरणाच्या या चालू स्थितीमध्ये आता चलनवाढ अर्थव्यवस्थेचा एक आवश्यक भाग बनला आहे. ‘फरक फक्त एवढाच’ आहे की याचा दर कधी कमी होऊ शकतो तर कधी जास्त. अशामध्ये आपण विसाव्या शतकात आर्थिक मापदंड कायम ठेवून परंपरागत पद्धतीने फक्त पगार, पेंशन किंवा एका मर्यादित प्रमाणात कृषी संसाधनांपासून प्राप्त उत्पन्नाने आपले पाऊल वर्तमान व्यवस्थेशी मिळवून चालू शकू, हा विचार करणेसुद्धा फक्त एक कल्पना आहे.
अशा स्थितीत आपले भविष्य सुविधाजनक आणि सुरक्षित बनवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे, की आपण आपल्या जमा संपत्तीची क्रयक्षमता वाढविण्यासाठी एका सुविधाजनक मार्गाचा शोध ध्यावा आणि त्यासाठी एक चांगली पद्धत आहे चांगली गुंतवणूक. अशी गुंतवणूक जीमध्ये आपणा फक्त आपल्या जमा पैशांचे, मूल्य वाढवू शकू, नाही तर या वृद्धीला चलनवाढीच्या दरापासून वेगळे ठेवू शकू. जर चलनावाढीचा दर ८ टक्के आहे तर कर वगैरे वजा करून उत्पन्नात १०-१२ टक्के वृद्धी झाली तरच आपण आपली क्रयक्षमता वाढवू शकाल.
आपल्यासाठी गुंतवणुकीचा मूल सिद्धांत समजणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजे आपण वर्तमानाशी पावलाला पाऊल मिळवून चालू शकू आणि आपले भविष्य सुरक्षित बनवू शकू.
शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे
| फायदे (Benefits) | जोखीम (Risks) |
|---|---|
| दीर्घकालीन संपत्ती निर्मिती | बाजारपेठेतील चढउतार |
| विविधीकरण | कंपनीचे अपयश |
| नियमित परतावा | परतावा अनिश्चित |
| स्वामित्व हक्क | लिक्विडिटी |
| कर लाभ | फसवण्याचा धोका |
आपण शेअर बाजारात होणाऱ्या प्रचंड कमाईच्या कथा जरूर ऐकल्या असतील आणि आपल्या मनातही या तन्हेचा नफा कमावण्याची इच्छा झाली असेल. पण आपण आपल्या एखाद्या मित्राच्या संदर्भात अशी भीतिदायक बातमी ऐकली असेल की तो कशा तऱ्हेने शेयर बाजारात आपले भांडवल घालवून बसला आहे आणि तेव्हा आपण स्वतःलाच धीर दिला असेल की शेयर बाजारात पैसे न गुंतवून आपण योग्यच केले आहे.
शेअरविषयी पूर्वावग्रह सोडून हे जाणून घेण्याचे प्रयत्न करा की शेअर म्हणजे काय. विचारवंत गुंतवणूकदार समजदारीने शेयर खरेदी करतो आणि नका मिळविण्यात यशस्वी होतो.
अनेक अभ्यासानंतर हे स्पष्ट झाले आहे की दीर्घावधीमध्ये इतर सर्व संपत्तीच्या तुलनेमध्ये शेयर पासून सर्वांत जास्त मिलकत होते. याचा अर्थ हा आहे की, आपण बॉण्ड फिक्स्ड डिपॉझीट वा सोन्यात गुंतवणूक करून जेवढा नफा कमवाल त्यापेक्षा जास्त नफा शेअर बाजारात गुंतवणूक करून मिळवू शकता.
शेयर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आपण शेअरविषयक आवश्यक महिती जाणून घेणे आवश्यक आहे.
शेयर विषयी समजून घेणे अंतरीक्ष विज्ञान समजून घेण्याएवढे कठीण नाही. आपण आपली संपत्ती कशा तऱ्हेने जास्तीत जास्त वाढवू शकतो आणि नुकसानीचे कारण कशा प्रकारे दूर करू शकतो,आपण या प्रकारचे बनण्यासाठी अत्याधिक ज्ञानी होण्याचे आवश्यक नाही.
आपल्याजवळ पुरेसा वेळ नाही तेव्हा आपण एखादा कार्यालयीन व्यवस्थापक किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता; परंतु आपल्याला काही मूलभूत बाबींची माहिती ठेवावी लागेल. हे जाणून घ्यावे लागेल की कोणता फंड चांगला आहे? फंड व्यवस्थापकाची निवड कशी करावी आणि त्याच्या कार्यावर कसे लक्ष ठेवावे?
कोणत्याही व्यवसायात अनेक प्रकारची संपत्ती असू शकते – यंत्र, इमारत, फर्निचर, रोकड वगैरे. अशा प्रकारच्या व्यवसायात देणेसुद्धा असू शकते. कंपनीवर दुसऱ्यांचे कर्ज असू शकते. बँकेचे कर्ज, उधार घेतलेली सामुग्री वगैरे देणी असू शकतात. मूळ संपत्ती-देणी मूळ भांडवल.
मूळ भांडवल म्हणजे तो पैसा जो व्यवसायात व्यक्तीजवळ असतो. जस जसा व्यवसाय वाढतो आणि लाभ होऊ लागतो तस तसे मूळ भांडवल वाढत जाते. याच मूळ भांडवलाला शेअर (वा स्टॉक) रूपात विभाजित केले जाते.
जर एखाद्या कंपनीचे मूळ भांडवल १० कोटी रुपये आहे तर याला १० रुपये प्रति शेअरप्रमाणे एक कोटी शेअर्समध्ये विभाजित केले जाऊ शकते.
मूळ भांडवलाचा भाग वा काही शेअर ज्याच्या जवळ राहतात ते व्यवसाय सुरू करतात आणि त्यांना ‘प्रमोटर्स’ म्हणतात.
बाकी शेअर्स गुतवणूकदाराकडे असतात. हे गुंतवणूकदार तुम्हा आम्हासारखे सामान्य लोक असतात म्युच्युअल फंड आणि अन्य संस्था गुतवणूकदार असतात.
शेयर खरेदीचा अर्थ
आता आपणास समजले असेल की शेयर खरेदीचा अर्थ व्यवसायात भागीदारी मिळविण्यासारखाच असतो.जेव्हा आपण शेअरमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपण बाजारात गुंतवणूक करीत नाहीत. आपण एका कंपनीच्या इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक करतो. या तऱ्हेने आपण कंपनीचे ‘शेयर होल्डर ‘ वा अंशरूपाने मालक बनतो.
आपण कंपनीच्या संपत्तीच्या अंशाचे मालक असतात म्हणून या तऱ्हेने संपत्तीपासून मिळणाऱ्या नफा वा नुकसानाचे भागीदारसुद्धा बनता.
समजा आपण गुजरात अंबुजा सिमेंटच्या १०० शेयर चे मालक आहात तर याचा अर्थ आहे की, आपण त्या कंपनीचे भागांचे मालक आहात कारण त्या कंपनीचे लाखो शेअर आहेत.
शेअर खरेदीचा अर्थ आहे की, एखादा व्यवसाय चालविण्याची डोकेदुखी विकत घेणे शिवाय त्या व्यवसायाचा भागीदार बनणे, उदाहरणार्थ गुजरात अंबुजा सिमेंटला नफा झाला तर आपल्या शेयर चा दरसुद्धा वाढू शकतो वा नुकसान झाल्यावर शेयर चा भाव कमी होऊ शकतो.
भाव वृद्धीचा अर्थ
जर एखाद्या कंपनीने आपले मूळ भांडवल १० रुपये प्रति शेअर हिशेबाने विभाजित केले तर १० रुपये शेअरची ‘फेस व्हॅल्यू’ म्हटली जाईल. जेव्हा शेयर ची खरेदी-विक्री शेअर बाजारात केली जाईल तेव्हा त्याची मागणी आणि पुरवठा याच्या आधारावर त्याच्या भावातसुद्धा फरक पडेल.
कंपनीचे शेयर खरेदी करण्यास इच्छुक असतील तर भाववृद्धि होईल. जर कोणीही शेयर खरेदी करण्यास उत्सुक नसेल तर आणि ज्यास्त संख्येने लोक त्या कंपनीचे शेयर विकू इच्छीत असतील तर भाव कमी होईल.
कोणत्याही वेळी शेयर बाजारातील शेअरच्या मूल्याला ‘शेयर मूल्य’ वा शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हटले जाते. अशा तऱ्हेने १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे शेअर ५५ रुपयात (फेस व्हॅल्यूच्या तुलनेत जास्त किमतीला) वा ९ रुपयात (फेस व्हॅल्यूच्या तुलनेत कमी किमतीला) विकले जाऊ शकतात.
जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेयर ची संख्या व त्यांची मार्केट व्हॅल्यूचा गुणाकार केला जातो तेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन समोर येते.
उदाहरण घ्यायचे म्हणून १नोव्हेंबर २००६ ला एका कंपनीच्या एक कोटी शेयर ची फेस व्हॅल्यू १० रुपये आणि मार्केट व्हॅल्यू ३० रुपये आहे तेव्हा १ नोव्हेंबर २००६ ला त्याचे मार्केट कॅपिटलायझेशन ३० कोटी म्हणता येईल.
कंपनीचे शेयर खरेदी करण्यास इच्छुक असतील तर भाववृद्धि होईल. जर कोणीही शेयर खरेदी करण्यास उत्सुक नसेल तर आणि ज्यास्त संख्येने लोक त्या कंपनीचे शेयर विकू इच्छीत असतील तर भाव कमी होईल.
कोणत्याही वेळी शेयर बाजारातील शेअरच्या मूल्याला ‘शेयर मूल्य’ वा शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हटले जाते. अशा तऱ्हेने १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे शेअर ५५ रुपयात (फेस व्हॅल्यूच्या तुलनेत जास्त किमतीला) वा ९ रुपयात (फेस व्हॅल्यूच्या तुलनेत कमी किमतीला) विकले जाऊ शकतात.
जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेयर ची संख्या व त्यांची मार्केट व्हॅल्यूचा गुणाकार केला जातो तेव्हा मार्केट कॅपिटलायझेशन समोर येते.
उदाहरण घ्यायचे म्हणून १नोव्हेंबर २००६ ला एका कंपनीच्या एक कोटी शेयर ची फेस व्हॅल्यू १० रुपये आणि मार्केट व्हॅल्यू ३० रुपये आहे तेव्हा १ नोव्हेंबर २००६ ला त्याचे मार्केट कॅपिटलायझेशन ३० कोटी म्हणता येईल.
शेयर खरेदी कशी करावी?
ही एक चांगली बाब आहे की, आपण शेयर बाजारात नशीब अजमावून पाहू इच्छिता. स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर्सची खरेदी विक्री केली जाते. भारतात दोन प्रमुख स्टॉक एक्सचेंज आहेत-नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एन. एस. ई.) आणि मुंबई स्टॉक एक्यचेंज (बी. एस. ई.). आपण तीन पद्धतीने शेयर खरेदी करू शकता, आपल्या दलालामार्फत ऑन लाईन डिमॅट अकाउंट उघडून व त्या वेळी खरेदी करू शकता जेव्हा एखादी कंपनी शेअर इश्श्यू करते, त्याला ‘इनिशियल पब्लीक ऑफरिंग ( आय. पी. ओ.) म्हणतात.
शेयर कसा निवडावा
साधारण आर्थिक ट्रेंडसर्वप्रथम टॉप डाऊन अॅप्रोचमध्ये आपण साधारण अर्थव्यवस्थेवर एक नजर टाकू. अर्थव्यवस्था ही समुद्रातील एखाद्या लाटेसारखी असते.
विभिन्न औद्यागिक समूह आणि व्यक्तिगत कंपन्या सारख्या आहेत. जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये तेजी येते तेव्हा हे समूह व कंपन्या नफा कमावतात आणि अर्थव्यवस्थेच्या उतारादरम्यान या कंपन्या व समूह नकारात्मक परिणाम करतात.
कंपनी कशाला म्हणतात?
शेयर बाजारात प्रवेश करण्यापूर्वी आपण जी शब्दावली सर्वप्रथम ऐकतो आणि सर्वात अगोदर जिचा संबंध येतो ती आहे कंपनी. ‘कंपनी’ शब्द मूळ रुपाने लॅटिन मधून घेतला आहे, ज्यात ‘Com’चा अर्थ ‘सोबत’ आणि ‘Panis’चा अर्थ ‘भाकरी’ आहे. प्रारंभी ‘कंपनी’ अशा काही व्यक्तींच्या समूहाला म्हटले जात होते जे आपली भाकरी सोबत मिळून खात होते. हळूहळू हा शब्द व्यापाऱ्यांची ओळख होऊन गेला, कारण त्या काळी बहुतेक व्यापारी लोक नेहमी आपले व्यावसायीक सौदे भोजन करताना पार पाडायचे यामुळे व्यापार करणाऱ्या संस्थेचे नाव कंपनी पडले; पण वर्तमान काळात याच्या अर्थात खूप बदल झाले. आता कंपनीचा आशय असा संध झाला आहे जीमध्ये संयुक्त भांडवल असते.आता कंपनी आपल्या विस्तृत अर्थाने असे व्यापारी संघटन, जे काही लोक (शेअर-होल्डर) एखादा व्यापार चालविण्यासाठी स्थापन करतात.
हेच शेयर -होल्डर कंपनीचे काम व्यवस्थितपणे चालविण्यासाठी आपले प्रतिनिधी मंडळ निवडतात. त्याला ‘बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ‘ म्हणतात.
दुसऱ्या शब्दांत कंपनी विभिन्न मनुष्याचा तो समूह आहे ज्याची स्थापना एखाद्या विशेष उद्देशासाठी केली जाते. हा संपूर्णपणे कायदेशीर समूह असतो, ज्याची निर्मिती विद्यमान कायद्या अंतर्गत केलेली असते. ज्याची जबाबदारी मर्यादित आणि अस्तित्व त्याच्या सदस्यांपुरते असते. सैद्धान्तिक दृष्टीने कंपनी दोन वर्गांमध्ये विभागली जाते
(१) भागीदारी
(२) वैयक्तिक मालकी.
वैयक्तिक मालकी असणाऱ्या व्यवसायांचे संचालन एकच व्यक्ती करते. तीच व्यक्ती व्यवसायात होणाऱ्या नफा-तोट्याला पूर्णपणे जबाबदार असते. तर भागीदारी प्रतिष्ठानात दोन वा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एखादा व्यवसाय लाभाच्या उद्देशाने करतात.
व्यवसाय शुरू करणे आणि तो चालू ठेवण्यासाठी जो पैसा मूळ पैशाच्या स्वरूपात लावला जातो त्याला ‘कॅपिटल’ म्हणतात. हे सुरवाती कॅपिटल शेअर होल्डर कडून घेतले जाते, कारण ते कंपनीचे भागीदार मालक असतात. शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या भांडवलास ‘ईक्विटी कॅपिटल’ म्हणतात. कंपन्या बँका, आर्थिक संस्था आणि जनतेकडून उधार घेऊन सुद्धा या कॅपिटलची सोय करतात. जनतेकडून हा पैसा ‘डिबेंचर’ (कर्जरोखे) ची विक्री करून कंपनी घेते किंवा फिक्स्ड डिपाझिट मार्फत. डिबेंचरची खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदाराला ‘डिबेंचर होल्डर’ म्हणतात. कंपनी या लोकांची कर्जदार असते. दुसऱ्या शब्दांत यांचे पैसे फेडण्यास कंपनी जबाबदार असते. त्याच वेळी शेयर-होल्डर्स कंपनीचे मालक असतात.
शेयर होल्डर्सचे कायदेशीर अधिकार
कायदा असे मानतो की शेअर होल्डर्स कंपनीच्या कोणताही निर्णय, कार्यपद्धती किंवा व्यावसायिक कराराशी प्रत्यक्षात संबंधात नसतो म्हणून त्याचा वैधानिक अधिकार आणि उत्तरदायित्व दोन्हीही मर्यादित असतात. कायद्यात कंपनीचे वेगळे स्थान आहे आणि शेअर होल्डर्सचे वेगळे. कंपनी आपल्या भागधारकांच्या परस्पर आपले प्रत्येक प्रकारचे व्यावसायिक करार करू शकते, मालमत्तेची खरेदी-विक्री करू शकते, कर्ज घेऊ शकते. कंपनीत काम करणाऱ्या संचालकांच्या कोणत्याही कृत्यासाठी शेअर-होल्डर्स जबाबदार नाहीत. एका भागधारकाची सर्व जबाबदारी त्या कंपनीतील त्याच्या शेयर्सच्या मूल्याएवढीच मर्यादित असते. ही त्याची फक्त ‘आर्थिक जबाबदारी असते जी, कंपनीचे शेअर खरेदीनंतर पूर्ण होते.उदाहरणासाठी समजा की एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे १० रुपयाचे १०० शेयर खरेदी केले तेव्हा कंपनीप्रती त्या व्यकतीची आर्थिक जबाबदारी १००० रुपयाची झाली जी शेयर खरेदीनंतर पूर्ण झाली. यानंतर जरी ती कंपनी दिवाळखोरीत निघाली तरी जास्तीत जास्त शेयर मार्केटमध्ये तिचा भाव शून्य होऊ शकतो म्हणजेच आपण आपले १००० रुपये गमावले पण कोणत्याही परिस्थितीमध्ये कायदा वा नैतिक रुपाने आपली कंपनी देणेकऱ्यांची परतफेड करण्यासाठी सांगू शकत नाही. या नियमाला वैधानिक भाषेत मर्यादित जबाबदारी वा ‘लिमिटेड लायबिलिटी’ म्हणतात.
प्रत्येक कंपनी आपल्या नावापुढे ‘ लिमिटेड ‘ शब्द वापरते हे कायद्याने बंधनकारक आहे यामुळे हे स्पष्ट होते की, कंपनीच्या भागधारकांची आर्थिक जबाबदारी मर्यादित आहे. यामुळे जेव्हा आपण एखाद्या कंपनीचाशेअर खरेदी करता तेव्हा पूर्ण निश्चित राहू शकता की, आपल्याला कंपनीच्या आर्थिक व कायदेशीर असण्याशी, अडचणीशी काहीही देणे-घेणे नाही.
आपण खरेदी केलेल्या शेयर चे मालकी हक्क आपण मिळवू शकता शेयर म्हणजे चल संपत्ती असतात. भागधारक याची इच्छेनुसार खेरदी-विक्री करू शकतो, भेट म्हणून कुणलाही देऊ शकतो, बक्षीसपत्र, मृत्युपत्र, वारसापत्र करू शकतो. यामध्ये कोणतीही कायद्ययाची बाबा त्याच्या मार्गात येऊ शकत नाही. कंपनीचे आपले स्वतःचे अस्तित्व असल्यामुळे शेअर-होल्डर रूपी मालक बदलल्यामुळे तीला काही फरक पडत नाही. कंपनी जेव्हा आपला व्यवसाय सुरू करते तेव्हा तिचे शेअर्स अंकित मूल्य (Face Value) नुसार सरळ खरेदी करता येतात. यातूनच कंपनी आपले सुरूवातीचे भांडवल उभे करते. त्यानंतर शेयर बाजारात होणाऱ्या सौद्यांचा कंपनीवर काहीही परीणाम होत नाही.
एक उदाहरण पाहू –
समाज की एखाद्या कंपनीचा १० रुपयांत इश्श्यू केलेला एखादा शेयर बाजारात २००० रुपये प्रति शेयर या भावाने विकला जात आहे, तर याचा अर्थ हा आहे का कंपनी अगोदरच २० पट अधिक संपन्न झाली आहे? नाही उलट याचा अर्थ हा आहे की बाजारात शेअरचे खरेदीदार कंपनीला चांगले समजत आहेत आणि गुंतवणूकदार तिच्या शेअरला २००० रुपयांत खरेदी करण्यासाठी तयार आहेत.
कंपन्यांचे प्रकार
कंपन्या दोन प्रकारच्या असतात
(१) पब्लिक लिमीटेड कंपनी आणि
(२) प्रायव्हेट लिमीटेड कंपनी.
प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे शेयर बाजारामार्फत खरेदी-विक्री केले जात नाहीत या कंपन्याना आपले शेयर जनतेमध्ये विकण्याची परवानगी नसते.
(१) पब्लिक लिमीटेड कंपनी आणि
(२) प्रायव्हेट लिमीटेड कंपनी.
प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे शेयर बाजारामार्फत खरेदी-विक्री केले जात नाहीत या कंपन्याना आपले शेयर जनतेमध्ये विकण्याची परवानगी नसते.
सदस्य यादी
सदस्यांची संपूर्ण माहिती, त्यांना लाभांश, राईट्स शेअर वा बोनस शेअर्स वगैरे पोचविण्याच्या सुविधांसाठी प्रत्येक कंपनी आपल्या भागधारकाची यादी ठेवते. या यादीमध्ये शेअर होल्डरचे नाव, पत्ता आणि अन्य आवश्यक माहिती समाविष्ट असते.
आजकाल ही माहिती नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझीटरीडिपाझिटरी लिमिटेड (NSDL), सेंट्रल सिक्यूरेटीज डिपाझिटरी लिमिटेड (CSDL) यांच्याकडे सुद्धा ठेवली जाते.
वार्षिक माहिती
प्रत्येक कंपनी आपले कामकाज आणि खात्यांच्या माहितीसोबत एक वार्षिक अहवाल तयार करते. ही सर्व माहिती सर्व भागधारकांना कंपनीच्या वार्षिक सभा व (Annual General Board Meeting) च्या काही दिवस अगोदर पाठविली जाते. या वार्षिक रिपोर्टसोबत कंपनीचे बॅलन्सशीट (Balance Sheet) आणि नफा-तोटा हिशेब (Profit & Loss Account) सुद्धा असतो. ही माहिती भाग-धारक आणि नवीन गुंतवणूकदारास, जे या कंपनीत गुंतवणूक करण्याविषयी विचार करीत आहेत बरीच आवश्यक असते.
हा अहवाल घोषित कंपनीत व्यवसायाची स्थिती, भविष्यातील योजना, लाभांशाची घोषणा आणि अशा अनेक गोष्टींचा खुलासा करतो. ज्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक स्थितीवर होतो. हा अहवाल खरा असल्याची खात्री गुंतवणूकदार ऑडिटरच्या अहवाला वरुन करून घेऊ शकतात.
नवीन गुंतवणूकदारांसाठी या वार्षिक अहवालाची माहिती अत्यंत आवश्यक एवढयाकरिता असते की तो गुंतवणुकीपूर्वी त्या कंपनीची संपूर्ण स्थिती आणि स्वतःच्या गुंतवणुकीविषयीच्या भवितव्याबाबत पूर्णपणे निर्धास्त होऊ शकेल.
शेअर्सचे प्रकार
शेअर्स आपल्या बाजाराची स्थिती आणि सिद्धांतानुसार प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात(१) प्रिफरन्स शेअर आणि
(२) इक्विटी शेअर्स
१. प्रिफरन्स शेयर (Preference Share)
हे शेअर्स असे असतात ज्यांवर लाभांशाचा दर निश्चित असतो. जर कोणत्याही परिस्थीतीत कंपनी बंद झाली तर लाभांश आणि मूल भांडवलाच्या परतफेडीवर या शेअर्सचा अधिकार इक्विटी शेअर्सच्या अगोदर असतो. जर कोणत्याही परिस्थितीमध्ये कंपनी बाजारात नफा कमवू शकत नसेल तर किंवा या भागधारकाना लाभांश देऊ शकत नसेल तर ती बहूमेलेटिव्ह शेअर जारी करते. या शेअर्सचा अर्थ असतोकी जेव्हा कंपनी नफा कमावीत असते आणि तिच्याकडे पैसे येतात तेव्हा ती आपला मागील सर्व बाकी लाभांश देते.
दुसाऱ्या शब्दांत प्रिफरन्स शेअर होल्डर्सना कंपनीच्या नफा व नुकसान यांची पर्वा नसते. यांचा निश्चित लाभांश कायम असतो. परंतु; याबरोबरच प्रिफरन्स शेअर होल्डर्सना त्यांचे भांडवल तोपर्यंत परत मिळत नाही जोपर्यंत कंपनी चालू आहे. फक्त एक प्रकारच्या प्रिफरन्स शेअर्सना हा नियम लागू पडत नाही ‘रीडयेबल प्रिफरन्स शेअर’. या शअर्सचे मूळ भांडवल एक निश्चित अवधी पूर्ण झाल्यानंतर परत करावे लागते.
दुसाऱ्या शब्दांत प्रिफरन्स शेअर होल्डर्सना कंपनीच्या नफा व नुकसान यांची पर्वा नसते. यांचा निश्चित लाभांश कायम असतो. परंतु; याबरोबरच प्रिफरन्स शेअर होल्डर्सना त्यांचे भांडवल तोपर्यंत परत मिळत नाही जोपर्यंत कंपनी चालू आहे. फक्त एक प्रकारच्या प्रिफरन्स शेअर्सना हा नियम लागू पडत नाही ‘रीडयेबल प्रिफरन्स शेअर’. या शअर्सचे मूळ भांडवल एक निश्चित अवधी पूर्ण झाल्यानंतर परत करावे लागते.
२. इक्विटी शेयर (Equity Share)
या प्रकारच्या शेअर्सवर निश्चित लाभांशाची हमी नसते. सरळ शब्दांत सांगायचे म्हणजे या शेअर्सवर कोणताही लाभांश मिळण्याची कोणतीही खात्री नसते. जो गुंतवणूकदार अधिकतम जोखीम घेऊन अधिक लाभ कमविण्यासाठी इच्छुक आहे, त्याच्यासाठी इक्विटी शेअर्सचा पर्याय आसतो. पण हे भागधारक कोणत्याही वर्षात लीभांश मिळविण्याचा अधिकार बाळगतात. इक्विटी भागधारकांनाच कंपनीचे मालक मानले जाते. या भागधारकांना कंपनीत सर्व महत्त्वपूर्ण मत देण्याचे अधिकार असतात.
कंपनीच्या वार्षिक बैठकीत यांच्या प्रस्तावित लाभांशाची घोषणा केली जाते. यात प्रत्यक्ष लाभांश वजा करून एकूण अंश विभाजीत केला जातो.
इक्विटी शेअर्समध्य सर्वांत जास्त धोका असतो आणि त्यानुसार त्याच्या प्रमाणात सर्वांत जास्त लाभ असतो. कंपनीच्या प्रगतीचा सर्वांत जास्त फायदा त्यांनाच मिळतो. जेथे प्रिफरन्स शेअर्सवर ठरावीक निश्चित लाभ मिळतो तेथे ईक्विटी शेयर्सवर नक्यासोबत लाभ वाढत असतो.
कंपनीच्या वार्षिक बैठकीत यांच्या प्रस्तावित लाभांशाची घोषणा केली जाते. यात प्रत्यक्ष लाभांश वजा करून एकूण अंश विभाजीत केला जातो.
इक्विटी शेअर्समध्य सर्वांत जास्त धोका असतो आणि त्यानुसार त्याच्या प्रमाणात सर्वांत जास्त लाभ असतो. कंपनीच्या प्रगतीचा सर्वांत जास्त फायदा त्यांनाच मिळतो. जेथे प्रिफरन्स शेअर्सवर ठरावीक निश्चित लाभ मिळतो तेथे ईक्विटी शेयर्सवर नक्यासोबत लाभ वाढत असतो.
शेअर्सचे अन्य काही प्रकार
प्रिफरन्स आणि इक्विटी शेअरशिवाय सुद्धा शेअर्सचे इतर प्रकार आहेत.
१. राइट्स शेयर (Rights Share)
कंपनी जे शेअर्स आपल्या मूल भांडवलात वृद्धीसाठी वेळोवेळी प्रचलित करते त्यांना राइट्स शेअर म्हणतात. एका प्रकारे हे ईक्यिटी शेयर्सच असतात. यांना राइट्स शेअर एव्हड्यासाठी म्हणतात की यांच्या खेरदीचा पहिला हक्क कंपनीच्या जुन्या भाग धारकांना असतो. ज्या भागधारकांजवळ जेवढे शेयर्स असतात त्याच प्रमाणात यांची विक्री करण्यात येते. जर नवीन राइट्स शेअर्स त्याच भावात विकले जात असतील ज्या भावात जूने शेअर्स विकले गेले होते तेव्हा जर त्यांची किंमत वाढलेली असेल तर त्यांना ‘प्रिमिअम’ म्हणतात.
२. बोनस शेयर्स (Bonus Share)
आपल्या भांडवलाच्या वृद्धीसाठी कंपनी अंशरूपात शेअर प्रचलित करते त्यांना बोनस शेअर्स म्हणतात. त्याचे एक नाव भांडवली अंश आहे. बोनस शेअर पासून अंशधारकांच्या अंशात वृद्धीबरोवर जास्त लाभांश कमविण्याची संधी असते. जेव्हा एखाद्या कंपनीजवळ लाभांशाची रक्कम मोठ्या स्वरूपात जमा होते तेव्हा कंपनी ती बोनस शेयरच्या रूपात ठेवी/भांडवलामध्ये परिवर्तित करते. यामुळे एखादी कंपनी प्रथम बोनस अंश निर्गमनानंतर बारा महिन्यांनी याचा बोनस अंश जारी करते. यामध्ये भागधारकांना संचयाचा भाग लाभांश रूपात न मिळता अंशरूपात मिळतो.
एका उधाहरणाने समजणे सोपे होईल. समजा एक कंपनी ‘क्ष’ आपल्या भागधारकांना १: २ च्या प्रमाणात बोनस अंश प्रचलित त्यावर मिळणारा लाभांश प्रनपाध शेअर कॅपिटल = रु १,००,०००
१,००,००० शेअर @ १० प्रत्येकी
संचित जमा = रुपये २,००,०००
समजा एखाद्या व्यक्तीजवळ या कंपनीचे १०,००० शेअर्स रुपये १० च्या हिशेबाने रुपये १,००,००० मूल्यामध्ये आहेत. या कंपनीद्वारा बोनस अंश निर्गमित केल्यानंतर ५,००० बोनस अंश दिले जातील (१०,००० X १/२)
बोनस अंशाच्या निर्गमनानंतर त्या व्यक्तीजवळ या कंपनीचे १५,००० अंशवर मिळेल आणि त्याचा लाभांश दर वाढेल.
समूहाची निवड
बाजारात औद्योगिक समूहाची सक्रियता निर्धारित करण्याकरिता गुंतवणूकदार विकास दर, मार्केट साईज आणि अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे विश्लेषण जरूर करू इच्छितो. जसजसे शेअर चढ-उतार करू लागतात तसतसे तो समूहसुद्धा चढ-उतारातून जात असतो, जे गुंतवणूकदारांवर प्रभाव पाडतात.सर्वश्रेष्ठ निवड
समूहाची निवड केल्यानंतर गुंतवणूकदाराला समूहाच्या विभिन्न कंपन्यांचे विस्ताराने विश्लेषण केले पाहिजे, जे स्वतःच्या सेक्टरमध्ये सर्वश्रेष्ठ ठरतील. अशा प्रकारच्या कंपन्यांत त्या कंपन्यांची गणना केली जाते ज्या स्वतःच्या विस्ताराविषयी नेहमी आश्वस्त असतात. यात त्या कंपन्यासुद्धा असू शकतात, ज्या नवीन व्यवस्थापन लक्ष्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्नशील आहेत. एक गुंतवणूकदार त्या कंपन्याचीसुद्धा चौकशी करू शकतो ज्या मोठ्या पातळीवर आणि तांत्रिक सहयोगाने आपला फायदा वाढविण्यासाठी संयुक्त कार्य करीत आहेत. आपणास सर्वांत अगोदर कंपनी किंवा समूहाचा व्यवसाय, स्पर्धायुका वातावरण आणि भविष्याविषयीच्या योजना समजून ध्याव्या लागतील.
कंपनीचा स्तर कोणत्या प्रकारचे मार्किट शेअर, उत्पादन आणि प्रतिस्पर्ध्या द्वारा निर्धारित होते. वर्तमान पुढारी कोण आहे? आणि एका शेअरमध्ये होणारे बदल कोणत्या प्रकारे वर्तमान संतुलनावर परिणाम करतात. कोणत्या कंपनीच्या विरोधी वातावरणाचा अभ्यास योग्य आणि चुकीच्या कंपनीची निवड निर्धारित करतो.
गुंतवणूकदाराला प्रति शेअर मूल्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांचा अभ्याससुद्धा केला पाहिजे. सर्वांत अगोदर अशा कंपन्यांची निवड केली पाहिजे जी सकारात्मक उत्पन्नाविषयी सदैव आश्वस्त आहे आणि ज्यांचे उत्पन्न सकारात्मक आहे. हा डाटा कंपन्याच्या वार्षिक डाटा विभागातून प्राप्त करता येतो.
वार्षिक विकास दर
कंपनीच्या दीर्घकालीन फायद्यासाठी विकास दर आधाराचे काम करतो, याला असे मानता येईल. जर चालू आर्थिक वर्षाचा लाभ पूर्वीच्या ५ वर्षांच्या तुलनेत दुप्पट असेल तर याचा अर्थ आहे, की विकास दर १५ टक्के वर्षाला या हिशेबाने वाढत आहे. या प्रकारचे तुलनात्मक अध्ययन औद्योगिक समूहाच्या सरासरीने प्रमाणानेसुद्धा करता येते.
नफा-तोट्याचे मूल्यांकन
नफा-तोट्याचे मूल्यांकन
गुंतवणूकदार कंपनी वा फर्मची तिमाही विक्री आणि प्रतिशेअर विक्रीच्या परिणामाचे भागील तिमाहीच्या तुलनात्मक अभ्यासानंतर नफा वा तोट्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येते. तिमाही तोटा कोणत्याही कंपनीच्या भविष्यासाठी शुभ संकेत असू शकत नाही आणि गुंतवणूकदाराला या तोट्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयन्त केला पाहिजे.
लाभ प्रमाण प्रवृत्ती (प्रॉफिट मार्जिन ट्रेंड)
गुंतवणूकदार ज्या कंपनी व फर्मच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करू इच्छितो त्याला त्या कंपनीचा निव्वळ नफ्याचे प्रमाण आणि त्याच्या ट्रेंडचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे. आयकराचा दर अधिकांशत: स्थिर राहत नाही तेव्हा याच्या करातून अगोदरच नफा प्रमाण ट्रेंड प्री प्रॉफिट मार्जिनचे चांगलेच अंदाज करता येतात. करपूर्व नफा प्रमाणात फरक फक्त कराच्या दराचा असतो. वार्षिक नफा आणि तोटा खाते निव्वळ नफ्याच्या अगोदरच आयकराचा दर दर्शवितो. हाच दर जर गत पाच वर्षांत अधिकांशत: स्थिर असेल तर आपण निव्वळ नफ्याचे प्रमाण शोधू शकतो.
कर्ज/इक्विटी
कोणत्याही कंपनीचे कर्ज/इक्विटी प्रमाण या गोष्टीवर अवलंबून असते की ते कोणत्या उद्योगात कार्यरत आहे. उदाहरणासाठी गुंतवणुकीच्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणारे उद्योग जसे की, ऑटो मॅनुफॅक्चुरिंगमध्ये हे प्रमाण दोनपेक्षा जास्त असणे अपेक्षित आहे. व्यक्तिगत उपयोग असणाऱ्या कॉम्पुटर कंपनीत ०.५ पेक्षा कमी. जर कंपनीत वाढत असणाऱ्या गतिविधीच्या कार्यक्षेत्रासाठी पैसा जमा करण्यासाठी जास्त कर्ज घेतले जाते तेव्हा कंपनीचे उत्पन्न या कर्जाविना होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त होण्याची शक्यता असते. जर या कर्ज पुरवठ्यामुळे उत्पन्न कर्जाची गुंतवणुकी (व्याज) पेक्षा जास्त वाढली तर शेअरधारकांना (शेअर होल्डर्स) फायदा होती. कारण वाढलेले उत्पन्न तेवढयाच शेअर धारकांपर्यंत याविरुद्ध जर कर्जपुरवठयाची लागत यापासून होणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त होत असेल तर कंपनी दिवाळखोरीत निघण्याचा धोका निर्माण होतो. ज्याचा परिणाम शेवटी शेअरधारकावर होतो.
प्रतिशेअर उत्पन्न (रिटर्न ऑन इक्विटी)
आर. ओ. आय (रिटर्न ऑन इक्विटी) वा प्रति शेअर उत्पन्न शुद्ध नफा (एन. पी.) शेअरधारकांची सरासरी इक्विटी.
पण हेसुद्धा खरे आहे की, सर्व उच्च आर. ओ. आय. असणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणूक योग्य नसते. काही कंपन्यांचा आर. ओ. एफ. उच्च असतो पण त्यांच्याजवळ संपत्ती (असेट्स) नसते, जशा की कन्सल्टिंग फर्म. तर काही उद्योगांना नफ्याचा पहिला पैसा कमावण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभे करायचे असते. जसे की तेल उत्पादक कंपनी व ऑईल रिफायनर्स. यामुळे फक्त आर. ओ. ई. च्या आधारावर आपण कन्सल्टिंग फर्मला ऑईल रिफायनरीपेक्षा चांगली गुंतवणूक मानू शकत नाहीत. साधारणपणे जास्त भांडवलाची आवश्यकता असणाऱ्या उद्योगात सुरुवातीला जास्त अडथले असतात त्यामुळे प्रतिस्पर्धा कमी असते. त्याच वेळी उच्च आर. ओ. ई. असणाऱ्या फर्मला जिचे असेट्स कमी असतात जास्त प्रतिस्पर्धेचा सामना करावा लागतो. कारण कमी भांडवलाच्या जरुरीमुळे कोणीही तसे काम सुरू करू शकते. याशिवाय अन्य आर्थिक प्रमाण सूत्रांच्या तुलनेत आर. ओ. ला तुलनेसाठी सर्वांत चांगले समजले जाते.
वाढीचा दर
(ग्रोथ रेट) ग्रोथ रेट = रिटेंशन रेट = आय. ओ. ई. उच्च आर. ओ. ई. पासून शीघ्र फायदा होत नाही. स्टॉक प्राईसला सर्वांत जास्त प्रतिशेअर उत्पन्न (ई. पी. एस.) प्रभावित करते. यामुळे शक्य आहे, की २० % आर. ओ. ई, कंपनीसाठी १० % आर. ओ. ई. कंपनीच्या तुलनेत उत्पन्न दोन पटींनी (प्राईस/बुक टर्म्समध्ये) देत असतात. आपल्याचा नफा जास्त उच्च दराने उत्पन्नाच्या पुनर्गुंतवणुकीमुळे मिळतो, जी कंपनीला आणखी वरचा दर मिळवून देते. साधारणपणे आर. ओ. ई. निरर्थक ठरते, जर उत्पन्न परत पुन्हा गुंतविले नाही तर दीर्घकालीन ग्रोथ मॉडेल्समध्ये आढलून आले आहे, की जी फर्म डिव्हीडंट देते तिच्या उत्पत्रात वृद्धी कमी होते. उदाहरण म्हणून जर डिव्हीडंट २० % दिला गेला असेल तर अंदाजित दर आर. ओ. ई. वाढीचा ८०% असेल.
तुम्ही गुंतवणूकदार होण्यासाठी योग्य आहात का?
जोखीम सहन करण्याची क्षमता
गुंतवणूक म्हणजे जोखीम. शेअर बाजारपेठ चढउतारां अधीन असते आणि तुमची गुंतवणूक कधीही कमी होऊ शकते. म्हणून, तुम्ही किती जोखीम सहन करू शकता याचा प्रामाणिकपणे आढावा घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीच्या मूल्यात झालेल्या चढउतारांमुळे झोप येत नसेल, तर तुम्ही कदाचित गुंतवणूक करण्यासाठी तयार नसाल.
दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची तयारी
शेअरमार्केट हा दीर्घकालीन संपत्ती निर्मितीचा मार्ग आहे. शेअर बाजारपेठेला चढउतार होण्यासाठी वेळ लागतो आणि तुमच्या गुंतवणूकीचे चांगले परतावा मिळवण्यासाठी कमीतकमी 5-10 वर्षांचा गुंतवणूक क्षितिज असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला लवकर पैसा आवश्यक असेल, तर शेअरमार्केट तुमच्यासाठी योग्य नसू शकतो.
बाजारपेठ समजून घेण्याची इच्छा
गुंतवणूक करण्यापूर्वी, बाजारपेठ कशी कार्य करते आणि त्यावर कोणते घटक प्रभाव पाडतात यांचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. कंपन्यांचे मूलभूत विश्लेषण, तांत्रिक विश्लेषण आणि आर्थिक संकेत समजून घेणे फायदेमद ठरू शकते. हे ज्ञान तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास आणि गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीम समजून घेण्यास मदत करेल.
आत्मचिंतन करा आणि निर्णय घ्या
वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांवर विचार करा आणि तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी खरोखर तयार आहात का ते प्रामाणिकपणे स्वतःला विचारून पाहा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जोखीम सहन करू शकत नाही, दीर्घकालीन गुंतवणूक करू शकत नाही किंवा बाजारपेठ समजून घेण्यासाठी वेळ देऊ शकत नाही, तर आता गुंतवणूक करण्यापेक्षा तुमचे ज्ञान वाढवण्यावर आणि तयारी करण्यावर लक्ष केंद्रित करणे चांगले आहे. शेअरमार्केट हा एक दीर्घकालीन खेळ आहे आणि योग्य तयारी केल्याने तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार बनण्यासाठी आधार मिळेल.
गुंतवणूक प्रकार (Types of Investments):
शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येकाचा फायदे आणि तोटे असतात आणि तुमच्या आर्थिक ध्येयांनुसार आणि जोखीम सहनशीलतेनुसार तुमच्यासाठी योग्य पर्याय निवडणे महत्वाचे आहे. या विभागात, काही लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांचा थोडक्यात परिचय करून देऊया:
1. प्रत्यक्ष शेअर्स (Direct Shares):
1. प्रत्यक्ष शेअर्स (Direct Shares):
कंपन्यांचे प्रत्यक्ष स्वामित्व मिळवण्याचा मार्ग.
कंपनीच्या कामगिणीवर आधारित नफा आणि लाभांश मिळवण्याची क्षमता.
जास्तीत जास्त परतावा मिळण्याची शक्यता, पण जास्तीत जास्त जोखीम असते.
बाजारपेठेचे चांगले ज्ञान आणि विश्लेषण कौशल्य आवश्यक.
2. म्युच्युअल फंड्स (Mutual Funds):
कंपनीच्या कामगिणीवर आधारित नफा आणि लाभांश मिळवण्याची क्षमता.
जास्तीत जास्त परतावा मिळण्याची शक्यता, पण जास्तीत जास्त जोखीम असते.
बाजारपेठेचे चांगले ज्ञान आणि विश्लेषण कौशल्य आवश्यक.
2. म्युच्युअल फंड्स (Mutual Funds):
व्यावसायिक फंड मॅनेजर तुमच्यासाठी विविध प्रकारच्या गुंतवणूकीचे व्यवस्थापन करतात.
विविधीकरणाचा फायदा मिळतो, म्हणजे जोखीम कमी होते.
गुंतवणूक करण्यासाठी तुलनेने कमी रक्कम लागते.
परतावा बाजारपेठेच्या कामगिणीवर अवलंबून असत
3. बॉण्ड्स (Bonds):
विविधीकरणाचा फायदा मिळतो, म्हणजे जोखीम कमी होते.
गुंतवणूक करण्यासाठी तुलनेने कमी रक्कम लागते.
परतावा बाजारपेठेच्या कामगिणीवर अवलंबून असत
3. बॉण्ड्स (Bonds):
सरकार किंवा कंपन्या issued केलेली कर्ज देयके.
ठराविक व्याजदराने नियमित परतावा मिळवण्याची हमी.
तुलनेने कमी जोखीम, पण परतावा कमी असतो.
दीर्घकालीन गुंतवणूक क्षितिजासाठी चांगला पर्याय.
ठराविक व्याजदराने नियमित परतावा मिळवण्याची हमी.
तुलनेने कमी जोखीम, पण परतावा कमी असतो.
दीर्घकालीन गुंतवणूक क्षितिजासाठी चांगला पर्याय.
4. गोल्ड ETFs (Gold ETFs):
सोनामध्ये गुंतवणूक करण्याचा सोयीस्कर मार्ग.
भौतिक सोना खरेदी करण्याऐवजी कागदी पत्रांमध्ये गुंतवणूक.
सोनाच्या किंमतीत वाढ झाल्यास नफा मिळण्याची शक्यता.
इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा कमी विविधीकरण.
ही फक्त काही लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांची उदाहरणे आहेत. त्याशिवाय अनेक गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत आणि योग्य पर्याय निवडण्यासाठी सखोल संशोधन आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
गुंतवणूक कौशल्ये (Investment Skills):
शेअरमार्केटमध्ये यशस्वी होण्यासाठी केवळ योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे पुरेसे नाही. गुंतवणूक कौशल्य विकसित करणे आणि बाजारपेठ समजून घेणेही आवश्यक आहे. या विभागात, गुंतवणूकदार म्हणून तुमच्या यशाची गुरुकिल्ली असलेल्या काही महत्वाच्या कौशल्यांची चर्चा करूया.1. कंपन्यांचे मूलभूत विश्लेषण (Fundamental Analysis of Companies)
गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचे सर्वंकष मूल्यांकन करणे.
कंपनीची आर्थिक स्थिती, व्यवसाय मॉडेल, बाजारपेठ स्थान आणि व्यवस्थापन गुणवत्ता यांचा अभ्यास करणे.
कंपनीच्या दीर्घकालीन वाढीची क्षमता समजून घेणे.
कंपनीच्या मूल्यांच्या तुलनेत त्यांच्या शेअरच्या किंमतीचे मूल्यांकन करणे.
उदाहरणार्थ, कंपनीची कमाई, कर्ज, नफा आणि शेअरधारकांची इक्विटी यासारखे आर्थिक निर्देशक तपासून कंपनीची आर्थिक स्थिती समजून घेता येते. तसेच, कंपनीची उत्पादने, प्रतिस्पर्धी आणि बाजारपेठेतील स्थान यांचा अभ्यास करून तिची वाढीची क्षमता समजून घेता येते.
2. तांत्रिक विश्लेषण समजून घेणे (Understanding Technical Analysis)
तांत्रिक विश्लेषण हे बाजारपेठेतील किंमतीच्या चालींचा आणि दिशेचा अभ्यास करणे आहे.
गतकालीन किंमती आणि ट्रेडिंग व्हॉल्यूमवर आधारित चार्ट आणि इंडिकेटर्सचा वापर करून भविष्यातील किंमत वाढी किंवा घट कळण्याचा प्रयत्न.
तांत्रिक विश्लेषण काही वेळा उपयुक्त ठरू शकते, परंतु ते फक्त एकच घटक आहे आणि त्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक आहे.
3. भावनिक गुंतवणूक टाळणे (Avoiding Emotional Investing)
अनेक गुंतवणूकदार भावनांवर आधारित निर्णय घेतात, जसे की भीती किंवा लालसा यांमुळे.
जेव्हा बाजारपेठ घटते तेव्हा घाबरून गुंतवणूक बाहेर काढणे किंवा किंमती वाढल्यावर भावनिक झाल्यामुळे योग्य नसलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे यासारख्या चुका होऊ शकतात.
भावनिक निर्णय टाळण्यासाठी, दीर्घकालीन गुंतवणूक क्षितिज ठरवा, तुमची जोखीम सहनशीलता समजून घ्या आणि तुमच्या गुंतवणूक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा.
फायदे (Benefits)जोखीम (Risks)इतर महत्वाची माहिती
परतावा क्षमता (Return Potential) इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत जास्त परतावा मिळण्याची शक्यता बाजारपेठेतील चढउतारांमुळे गुंतवणूक कधीही कमी होऊ शकते दीर्घकालीन गुंतवणूक क्षितिज आणि जोखीम सहनशीलता महत्वाची.
स्वामित्व (Ownership) काही कंपन्यांमध्ये थेट मालकी हक्क मिळवता येतो (इक्विटी गुंतवणूक) कंपनी कामगिरी वाईट राहिल्यास नुकसान होऊ शकते कंपनी आणि बाजारपेठेचे संशोधन करणे आवश्यक.
विविधीकरण (Diversification) विविध प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी करता येते प्रत्येक पर्यायाचे स्वतःचे फायदे-तोटे असतात तुमच्या आर्थिक ध्येयांनुसार विविधीकरणाची योजना करा.
नियमित परतावा (Regular Returns) म्युच्युअल फंड्स आणि डिबेंचरसारख्या काही पर्यायांमधून नियमित लाभांश किंवा व्याज मिळते परतावा बाजारपेठेच्या कामगिरीवर अवलंबून असतो गुंतवणूक करण्यापूर्वी परतावा दर आणि जोखीम समजून घ्या.
लिक्विडिटी (Liquidity) काही गुंतवणूक पर्याय जसे की इक्विटी लिक्विड असतात आणि त्या सहज खरेदी-विक्री करता येतात काही पर्याय कमी लिक्विड असतात आणि त्यांची त्वरित विक्री कठीण असते तुमच्या गरजेनुसार लिक्विडिटीचा विचार करा.
नियमन (Regulation) SEBI सारख्या नियामक संस्थांकडून बाजारपेठ आणि मध्यस्थींचे नियमन केले जाते फसव्याचा धोका अजिबात टळत नाही केवळ नोंदणीकृत आणि नामवंत मध्यस्थींकडेच गुंतवणूक करा.
कर फायदे (Tax Benefits) काही गुंतवणूक पर्यायांवर कर सूट मिळते कर नियमांमध्ये बदल होऊ शकतात गुंतवणूक करण्यापूर्वी कर सल्लागाराचा सल्ला घ्या.
शेअर बाजार गुंतवणूक: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
शेअर बाजारात गुंतवणूक सुरू करण्यासाठी किती पैसे लागतात?
तुम्ही कितीही रकमेने ( अगदी काही हजारांनी) गुंतवणूक सुरू करू शकता. SIP (Systematic Investment Plan) द्वारे गुंतवणूक करणे हा उत्तम पर्याय आहे.
गुंतवणूक सुरक्षित आहे का?
कोणतीही गुंतवणूक 100% सुरक्षित नसते. शेअर बाजारात जोखीम असते आणि तुमची गुंतवणूक कमी होऊ शकते. परंतु, संशोधन करून, विविधीकरण करून आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून जोखीम कमी करता येते.
मला किती परतावा मिळेल?मिळणारा परतावा गुंतवणूक केलेल्या पर्यायावर, बाजारपेठेच्या कामगिरीवर आणि गुंतवणूक कालावधीवर अवलंबून असतो. इतिहास घडवलेला परतावा भविष्यातील परताव्याची गॅरंटी नाही.
मला गुंतवणूक कुठे करावी लागेल?तुमच्या जोखीम सहनशीलता आणि आर्थिक ध्येयांनुसार तुम्ही विविध पर्याय निवडू शकता, जसे की इक्विटी, म्युच्युअल फंड्स, बॉण्ड्स, सोने इत्यादी. SEBI नोंदणीकृत आणि नामवंत मध्यस्थींमार्फतच गुंतवणूक करा.
SIP म्हणजे काय?
मला किती परतावा मिळेल?मिळणारा परतावा गुंतवणूक केलेल्या पर्यायावर, बाजारपेठेच्या कामगिरीवर आणि गुंतवणूक कालावधीवर अवलंबून असतो. इतिहास घडवलेला परतावा भविष्यातील परताव्याची गॅरंटी नाही.
मला गुंतवणूक कुठे करावी लागेल?तुमच्या जोखीम सहनशीलता आणि आर्थिक ध्येयांनुसार तुम्ही विविध पर्याय निवडू शकता, जसे की इक्विटी, म्युच्युअल फंड्स, बॉण्ड्स, सोने इत्यादी. SEBI नोंदणीकृत आणि नामवंत मध्यस्थींमार्फतच गुंतवणूक करा.
SIP म्हणजे काय?
SIP हा नियमितपणे ठराविक रक्कम गुंतवणूक करण्याचा सोपा मार्ग आहे. यामुळे रुपये-सरासरीचा फायदा होतो आणि दीर्घकालात संपत्ती निर्मिती होते.
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड हा व्यावसायिक फंड मॅनेजर एकत्रित केलेल्या पसाने विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूकदारांना या फंडाच्या युनिट्स खरेदी करता येतात.
डिविडेंड म्हणजे काय?
काही कंपन्या गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणूकीवर लाभांश वाटतात.
कंपाउंडिंग म्हणजे काय?मिळालेला परतावा पुन्हा गुंतवणूक केला जातो आणि त्यावरील परतावा मिळतो. यामुळे दीर्घकालात गुंतवणूक वाढण्यास मदत होते.
शेअर बाजार कसा चालतो?
शेअर बाजार हा एक संस्थात्मक बाजार आहे जिथे गुंतवणूकदार कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री करतात. शेअर बाजारात खरेदी-विक्री हे मागणी आणि पुरवठ्यावर आधारित असते. मागणी वाढल्यास शेअर किंमती वाढतात आणि पुरवठा वाढल्यास शेअर किंमती घटतात.
शेअर बाजारात दोन प्रमुख प्रकारचे खरेदीदार असतात:
शेअरहोल्डर्स: हे लोक किंवा संस्था आहेत ज्यांना कंपनीच्या मालकीचे भाग आहेत.
व्यापारी: हे लोक किंवा संस्था आहेत ज्यांना शेअर बाजारातून नफा कमावण्याचा प्रयत्न आहे.
शेअर बाजारात खरेदी-विक्री करण्यासाठी, गुंतवणूकदारांना शेअर ब्रोकरकडे खाते उघडावे लागते. शेअर ब्रोकर्स गुंतवणूकदारांच्या वतीने शेअर खरेदी-विक्री करतात आणि त्यासाठी शुल्क आकारतात.
शेअर किंमती का वाढतात आणि घटतात?
शेअर किंमती अनेक घटकांमुळे प्रभावित होतात, ज्यात समाविष्ट आहे:
कंपनीची कामगिरी: जर कंपनीची कामगिरी चांगली असेल, तर त्याचे शेअर्स मागणीत असतील आणि त्यांची किंमत वाढेल.
आर्थिक परिस्थिती: जर देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि शेअर किंमती वाढतील.
राजकीय परिस्थिती: जर देशाची राजकीय परिस्थिती स्थिर असेल, तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि शेअर किंमती वाढतील.
जगभरातील बाजारपेठेची परिस्थिती: जागतिक बाजारपेठेतील बदल शेअर बाजारावर परिणाम करू शकतात.
कम्पनीचे विश्लेषण कसे करावे?
कंपनीचे विश्लेषण करण्यासाठी, गुंतवणूकदारांना खालील गोष्टींचा विचार करावा लागतो:
कंपनीचे आर्थिक विवरण:
यामध्ये कंपनीची उत्पन्न, खर्च, नफा आणि तोटा यांचा समावेश होतो.
कंपनीचे व्यवसाय मॉडेल:
कंपनीचा व्यवसाय कसा काम करतो आणि तो भविष्यात कसा विकसित होण्याची शक्यता आहे.
कंपनीचे व्यवस्थापन:
कंपनीचे व्यवस्थापन प्रभावी आहे का आणि कंपनीच्या दीर्घकालीन यशासाठी सक्षम आहे का.
कंपनीचे स्पर्धात्मक वातावरण: कंपनीचे स्पर्धक कोण आहेत आणि कंपनीची स्पर्धात्मक स्थिती कशी आहे.
गुंतवणूक सल्लागार आवश्यक आहे का?
गुंतवणूक सल्लागार आवश्यक आहे की नाही हे तुमच्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून असते. जर तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणूक करण्याबद्दल कमी माहिती असेल किंवा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल, तर गुंतवणूक सल्लागार उपयुक्त ठरू शकतो.
गुंतवणूक सल्लागार तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी योग्य गुंतवणूक पर्याय शोधण्यात, तुमच्या गुंतवणुकीचे विश्लेषण करण्यात आणि तुमच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्यात मदत करू शकतात.
तथापि, गुंतवणूक सल्लागाराची मदत घेण्यापूर्वी, तुम्ही त्यांचे अनुभव आणि पार्श्वभूमी तपासून पाहिली पाहिजे. तुम्ही त्यांच्या सेवांसाठी शुल्क देखील विचारात घेतले पाहिजे.
काही चांगले चॅनल
MoneyTap Marathi: https://www.youtube.com/channel/UC-9Vzpidu0cCqa8ERCBiNMw
Zee Business Marathi: https://www.youtube.com/channel/UCkXopQ3ubd-rnXnStZqCl2w
CNBC Marathi: https://www.youtube.com/channel/UCQIycDaLsBpMKjOCeaKUYVg
CA Rachana Ranade: https://www.youtube.com/channel/UCe3qdG0A_gr-sEdat5y2twQ
Share Market Mastermind: https://www.youtube.com/watch?v=gFdroVBFZ94
The Economic Times Marathi: https://marathi.economictimes.com/markets
Zee Business Marathi: https://www.youtube.com/channel/UCkXopQ3ubd-rnXnStZqCl2w
CNBC Marathi: https://www.youtube.com/channel/UCQIycDaLsBpMKjOCeaKUYVg
CA Rachana Ranade: https://www.youtube.com/channel/UCe3qdG0A_gr-sEdat5y2twQ
Share Market Mastermind: https://www.youtube.com/watch?v=gFdroVBFZ94
The Economic Times Marathi: https://marathi.economictimes.com/markets
निष्कर्ष
शेअर बाजार हा कमी वेळात संपत्ती निर्मितीचा शक्यता असलेला मार्ग आहे. परंतु त्यात जोखीमही असतात. ही पोस्ट तुम्हाला सुरुवातीपासून यशस्वी गुंतवणूकदार बनण्यासाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन करते.
आम्ही काय sharemarket in marathi कव्हर केले?
पहिली पाऊले: गुंतवणूक सुरू करण्याचे सोपे टिप्स, जसे की SIP द्वारे नियमितपणे गुंतवणूक आणि जोखीम कमी करण्यासाठी विविधीकरण.
महत्त्वपूर्ण मुद्दे: जोखीम समजून घेणे, नोंदणीकृत मध्यस्थींकडे गुंतवणूक करणे, संशोधन आणि विश्लेषण करणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवण्याचे महत्त्व.
अधिक माहिती: वारंवार विचारले जाणारे प्रश्न, सध्याच्या शीर्ष कंपन्या (केवळ माहितीपूर्ण), आणि इतर संबंधित संसाधने.
तुम्ही काय करू शकता?
तुमच्या जोखीम सहनशीलतेनुसार गुंतवणूक पर्याय शोधा आणि तुमच्या आर्थिक ध्येयांनुसार गुंतवणूक योजना तयार करा.
तुमच्या गुंतवणूकीचे नियमितपणे विश्लेषण करा आणि तुमची गुंतवणूक रणनीती समायोजित करा.
शेअर बाजारात गुंतवणूक ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्यात चढउतार अपेक्षित आहेत. धैर्य आणि शिस्त राखून गुंतवणूक सुरू ठेवा.
कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतंत्र संशोधन करणे आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शेअरमार्केट गुंतवणूक ही जोखीममुक्त नाही आणि तुमची गुंतवणूक कधीही कमी होऊ शकते.
Tags:
फायनान्स
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)